शिवसेनेच्या त्या दोन नेत्यांची दिलजमाई

िवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते आणि शिवसेनेचेच राज्य सरकारचे मंत्री रामदास कदम यांच्यातले ताणलेले संबंध सर्वांनाच परिचयाचे आहेत. 

Updated: Sep 25, 2016, 09:58 PM IST
शिवसेनेच्या त्या दोन नेत्यांची दिलजमाई title=

मुंबई : शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते आणि शिवसेनेचेच राज्य सरकारचे मंत्री रामदास कदम यांच्यातले ताणलेले संबंध सर्वांनाच परिचयाचे आहेत. कोकणातले हे दोन्ही नेते, कोणत्याही कार्यक्रमात एकत्र येणं शक्यतो टाळतात. मात्र मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, हे दोन्ही नेते एकत्र आलेले पाहायला मिळाले.

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या मुंबईतल्या विलेपार्ले कार्यालयात, राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अनपेक्षीतपणे हजेरी लावली. उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर आणि संपर्क प्रमुख विजय कदम यांच्या मध्यस्थीनं रामदास कदम यांनी अनंत गीते यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.