शिवसेनेने पाठिंबा काढला तर भाजप सरकारच्या विरोधात १५० आमदार : अजित पवार

निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत आहे. तशी निवडणूक प्रचारात रंगत वाढली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष एकमेकांना इशारा देण्यात दंग आहे. महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढला तर १५० आमदार विरोधात जातील, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 9, 2017, 05:03 PM IST
शिवसेनेने पाठिंबा काढला तर भाजप सरकारच्या विरोधात १५० आमदार : अजित पवार title=

पुणे : निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत आहे. तशी निवडणूक प्रचारात रंगत वाढली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष एकमेकांना इशारा देण्यात दंग आहे. महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढला तर १५० आमदार विरोधात जातील, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलाय.

महापालिकांच्या निकालावर हे सरकार टिकेल की नाही हे ठरेल असं वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. ते बारामती तालुक्यातल्या कन्हेरीमध्ये बोलत होते. महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेनं पाठिंबा काढून घेतल्यास जवळपास दीडशे आमदार विरोधात जातील असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच भाजपने उत्तर प्रदेशात आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या घोषणा केल्या आहे. मग महाराष्ट्रात शेतकऱ्याचे कर्ज माफ का करत नाहीत, असा रोखठोक सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.