आरटीओतील एजंटचा परिवहन मंत्री रावतेंना पुळका

RTO मधील एजंटगिरीवरून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चक्क परिवहन आयुक्तांची बाजू घेण्याऐवजी एजंटची घेतली. ही बाजू घेताना मीडियावरच खापर फोडले.

Updated: Jan 20, 2015, 10:28 AM IST
आरटीओतील एजंटचा परिवहन मंत्री रावतेंना पुळका title=

पुणे : RTO मधील एजंटगिरीवरून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चक्क परिवहन आयुक्तांची बाजू घेण्याऐवजी एजंटची घेतली. ही बाजू घेताना मीडियावरच खापर फोडले.

दरम्यान, RTO मधील एजंटगिरीवरून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आता सारवासारव सुरू केली आहे. RTO कार्यालयातील एजंटगिरी विरोधात सुरू झालेल्या मोहीमेबाबत पुण्यात विचारले असता, 'एजंट म्हणजे काय रे भाऊ...' असा उलट सवाल त्यांनी पत्रकारांना विचारला होता. 

RTO एजंटांचा रावतेंना एवढा पुळका का, असा सवाल केला जात असतानाच, त्यांनी शब्दांची फिरवाफिरवी केली. एवढंच नव्हे तर पत्रकार वात्रटपणा, वाह्यातपणा करत असल्याचा भडीमारही त्यांनी केला.

परिवहन आयुक्त महेश झगडेंच्या मोहीमेला पाठिंबा देण्याऐवजी दिवाकर रावते एजंट शब्दाचा किस पाडण्यातच धन्यता मानत आहेत, अशानं RTOमधील एजंटगिरी कशी थांबणार, हा मोठा प्रश्नच आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.