जळगाव : गिरणा नदीवरील सात बंधा-यांना येत्या वीस जूनपर्यंत प्रशासकीय मान्यता देणार असून पुढल्या वर्षी जून महिन्यात या धरणांमध्ये पाणी साचेल असं आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये दिलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील गिरणा खो-यातील शेतक-यांच्या सिंचनाविषयींच्या प्रश्नांना झी 24 तासने गिरणेचा पंचनामा या वृत्त मालिकेतून वाचा फोडलीय. याच मालिकेची जलसंपदा मंत्र्यांनी दखल घेतली आहे.