पत्नीचा खून करुन पळ काढणाऱ्या पतीचा अपघातात मृत्यू

 पत्नीचा खून करुन पळ काढणा-या पतीचा भीषण कार अपघातात मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडलीय. 

Updated: Nov 12, 2016, 08:11 AM IST
पत्नीचा खून करुन पळ काढणाऱ्या पतीचा अपघातात मृत्यू title=

औरंगाबाद :  पत्नीचा खून करुन पळ काढणा-या पतीचा भीषण कार अपघातात मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडलीय. 

मृत पती हा पुण्यातील सॉफ्टेवेअर इंजिनिअर असून पोटगीच्या वादातून ही घटना घडली. मनोज गूरूले अस या अपघातात ठार झालेल्या पतीच नाव असून त्याने आपली घटस्फोटीत पत्नी अश्विनी हिचा जयविश्वभारती कॉलनीत गळा चिरून खून केला. 

हत्या केल्यानंतर तो कारने पळ काढताना लासूरस्टेशन नजीक शिंदी सिरसगाव परिसरात त्याची कार उलटली. या घटनेत पती मनोज गुरुले हा मरण पावला.