अमरावती : एक व्यक्ती ११ बैलगाड्या ओढतो हे आपण ऐकले तर विश्वास बसणार नाही. मात्र, हे वास्तव आहे. अमरावती जिल्ह्यतील चौसाळा या गावात ही परंपरा गेल्या शेकडो वर्षांपासून सुरु आहे.
या कार्यक्रमात गावातील सर्व जाती-धर्माचे नागरिक सहभागी होतात. विजयादशमीच्या दिवसापासून एक व्यक्ती ५ दिवस उपवास करतो. आणि त्याला या गाड्या ओढण्याचा मान मिळतो. कोजागिरी पौर्णिमेच्या दुस-या दिवशी हा कार्यक्रम असतो. उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या कमरेला दोर बांधून एक विशेष हुक अडकवले जातो आणि ती व्यक्ती चक्क ११ गाडे ओढतो.
गावाच्या शिमेवरून मरीमाता मंदिरापर्यंत एक ते दीड किलोमीटर हे गाडे ओढले जातात. हा उत्सव पाहण्या करिता पंचक्रोशीतील गावकरी येतात. सासरी गेलेल्या मुलीही या निमीत्त गावात येतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.