स्मार्ट सिटीसाठी आटापीटा, ग्रामीण भागातील चित्र चिंताजनक

एकीकडे सरकार स्मार्ट सिटीसाठी आटापीटा करत असतानाच ग्रामीण भागातील चित्र चिंताजनक आहे.  चंद्रपूर जिल्ह्यातील  सिंदेवाही तालुक्यातील आंबोली गावात आजही भुताखेतांवर विश्वास ठेवला जातोय. त्यातून तीन कुटुंबांवर बहिष्कार टाकण्यात आला. एक स्पेशल रिपोर्ट...

Updated: Oct 29, 2015, 06:51 PM IST
स्मार्ट सिटीसाठी आटापीटा, ग्रामीण भागातील चित्र चिंताजनक  title=

चंद्रपूर : एकीकडे सरकार स्मार्ट सिटीसाठी आटापीटा करत असतानाच ग्रामीण भागातील चित्र चिंताजनक आहे.  चंद्रपूर जिल्ह्यातील  सिंदेवाही तालुक्यातील आंबोली गावात आजही भुताखेतांवर विश्वास ठेवला जातोय. त्यातून तीन कुटुंबांवर बहिष्कार टाकण्यात आला. एक स्पेशल रिपोर्ट...

महाराष्ट्रात अंधश्रद्धेचं भूत समाजाच्या मानगुटी वर किती घट्ट बसलंय याची प्रचीती एका नव्या घटनेने पुढे आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आंबोली गावात ही घटना पुढे आली आहे. ऐन पावसाळ्यात गावातील जनावरे मृत्युमुखी पडू लागली. ग्रामस्थांनी एका मांत्रिकाच्या सहाय्याने पूजा बांधली. मात्र हा प्रकार थांबतो न थांबतो तेच गावातील २ महिलांनी स्वत:ला भूतबाधा झाल्याचा दावा केला. गावातील गोकुलदास मेश्राम, इंद्रजीत गावतुरे, आनंदराव नन्नावरे या तिघांनी आपल्यावर करणी केली. असा तिने आरोप केला. गावकर्यांनी कोणतीही खातरजमा न करता तिन्ही कुटुंबांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.  
 
गावाचा बहिष्कार फार टोकाला पोचला आहे. या बहिष्कृत कुटुंबाना किराणी, धान्य तर मिळत नाही मात्र या लहानग्यांना दूधदेखील मिळत नाही. 

बहिष्कारामुळे ऐन सुगीच्या दिवसात  तीनही बहिष्कृत कुटुंब शेतात राबण्याऐवजी घरात बसली आहेत. गावात कुणी बोलत नाही, शेतीच्या कामावर बोलावत नाही, इतकच काय पण शेतीला पाणी देखील देत नाही.कोणी या बहिष्कृत कुटुंबातील सदस्यांशी बोललं तर त्याला ५०१ रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असा अघोषित फतवाच ग्रामस्थांनी काढला आहे. 

बहिष्कृत कुटुंबातील काही सदस्यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना हा प्रकार सांगितला. स्मार्ट सिटी घोषणांच्या गदारोळात ग्रामीण भागातील अंधश्रद्धा निर्मूलन तेवढेच गरजेचे असल्याचे या घटनेने स्पष्ट केले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.