विजयदुर्ग : विजयदुर्ग समुद्रात मच्छीमारी करत असताना मच्छीमार मुनीर मुजावर यांच्या जाळ्यात तब्बल ७०० किलो वजनाचा आणि २० फुट लांबीचा नालिया जातीचा भला मोठा मासा सापडला.
या माशाचे तोंड पातीसारखे असून त्याला काटेरी सुळेदेखील आहेत. हा मासा किनाऱ्यावर आणल्यानंतर त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विजयदुर्ग येथील खोल समुद्रात मुनीर मुजावर हे रविवारी सकाळी दहाच्या सुमारास मच्छिमारी करत असताना त्यांच्या जाळ्यात हा भला मोठा मासा अडकला.
जाळ्यामुळे या माश्याच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा मासा किनाऱ्यावर आणल्यानंतर स्थानिकांनी माशाला पाहण्यासाठी गर्दी केली होती. हा मासा गाडीत चढवताना क्रेनचा वापर करावा लागला होता.