पुण्यात २० वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

पुण्यात एका २० वर्षीय विद्यार्थ्याचा विद्यार्थ्यांकडूनच खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 28, 2017, 12:38 PM IST
पुण्यात २० वर्षीय विद्यार्थ्याची हत्या title=

पुणे : पुण्यात एका २० वर्षीय विद्यार्थ्याचा विद्यार्थ्यांकडूनच खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गौरव जाधव हा २० वर्षांचा मुलगा पुण्यात सिंहगड कॉलेजमध्ये शिकत होता, त्याचा किरकोळ भांडणातून  दोन जणांनी खून केला.

गौरवला किरकोळ भांडणातून  बांबूने मारहाण करण्यात आली, यातच गौरवचा मृत्यू झाला. गौरव जाधव हा मूळचा साताऱ्याचा असून तो पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये बीबीए शिकत होता. 

खुनात सहभागी असणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठातून अटक करण्यात आली आहे. आकाश टोके आणि आशिष पवार अशी दोन आरोपींची नावं आहे.