पुणे : पुण्यातल्या कसबा पेठेत एका १६ वर्षांच्या मुलाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. काल दुपारी ३.३० च्या सुमारास किरकोळ कारणावरून ६ ते ७ जणांच्या टोळक्यानं मुलाला दारु पाजून पेटवून दिलं.
मुलगा गंभीर असून त्याला ससून रुग्णालयात दाखल कऱण्यात आलंय. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा एका टेंपोजवळ लघुशंका करत होता. तो बॅटरी चोरत असल्याचा संशय या टोळक्याला आल्यानं त्यांनी त्याला जाळलं. त्यानंतर तो मुलगा स्वतःच पोलिस स्टेशनला गेला आणि पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं.