...हे आहे देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव!

देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव होण्याचा मान नागपूर जिल्ह्यातल्या पाचगावला मिळालाय.

Updated: Jul 4, 2015, 11:02 PM IST
...हे आहे देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव! title=

नागपूर : देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव होण्याचा मान नागपूर जिल्ह्यातल्या पाचगावला मिळालाय.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेलं हे गाव डिजिटल इंडिया विकमध्येच हायटेक झालंय, हे विशेष...

महत्त्वाचं म्हणजे अवघी ५ हजार लोकवस्ती असलेल्या या गावात आजवर एकही सायबर कॅफे नव्हता.  परिणामी ग्रामस्थांना १८ किलोमीटरवर असलेल्या नागपूरला धाव घ्यावी लागत होती.

मात्र, आता वाय-फायनं जोडलं गेल्यामुळे गावाला माहितीचं महाजाल खुलं झालंय. गावातले तरूण आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या योजनेचं भरभरून स्वागत केलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.