सीसीटीव्हीनं पकडून दिला पुण्यातल्या जळीत कांडाचा आरोपी

पुणे वाहन जळीत कांड प्रकरणी अमन अब्दुल अली शेख या आरोपीला अटक करण्यात आलीय. सीसीटीव्हीतल्या दृश्यांवरुन त्याला अटक करण्यात आली. 

Updated: Jul 4, 2015, 10:09 PM IST
सीसीटीव्हीनं पकडून दिला पुण्यातल्या जळीत कांडाचा आरोपी title=

पुणे : पुणे वाहन जळीत कांड प्रकरणी अमन अब्दुल अली शेख या आरोपीला अटक करण्यात आलीय. सीसीटीव्हीतल्या दृश्यांवरुन त्याला अटक करण्यात आली. 

आरोपीनं गुन्हा करताना वापरलेलं दुचाकी वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुणे पोलीस अमन अब्दुल अली शेखला उद्या कोर्टात हजर करणार आहेत.

काही सोसायट्यांमधील सुमारे ८० वाहनं मध्यरात्रीच्या सुमारास जाळण्यात आली होती. त्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. 

महत्त्वाचं म्हणजे, या आरोपीनं यापूर्वी दोनदा गाड्या जाळल्या आहेत. १९९७ आणि २००६ मध्ये त्यानं असा गुन्हा केला होता. 

अमन सिंहगड रोड भागातील रहिवासी आहे. तो राहत असलेल्या सोसायटी मधील एक टू व्हीलर संशयास्पदरीत्या आधी जळाली आहे. त्याच सोसायटी मधील ६०-७० गाड्यांचे सीट कव्हर एकदा फाडण्यात आले होते. सोसायटीमध्ये सीसीटीव्ही बसल्यानंतर डीश टीव्ही एन्टेनाची मोडतोड करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.