नरेंद्र मोदींनी इतिहासाचा अभ्यास करावा, राज ठाकरेंची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतिहासाचा अभ्यास करावा, महाभारताच्या काळात अमेरिका नव्हती, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर केलीय. गिरगावला मनसेचे उमेदवार राजेंद्र शिरोडकर यांच्या प्रचारासाठी ते आले होते. 

Updated: Oct 12, 2014, 11:30 PM IST
नरेंद्र मोदींनी इतिहासाचा अभ्यास करावा, राज ठाकरेंची टीका title=

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतिहासाचा अभ्यास करावा, महाभारताच्या काळात अमेरिका नव्हती, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर केलीय. गिरगावला मनसेचे उमेदवार राजेंद्र शिरोडकर यांच्या प्रचारासाठी ते आले होते. 

यावेळी बोलतांना मोदींच्या परदेश दौऱ्यांवरून राज ठाकरेंनी हल्ला चढवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत बलात्कार करा, मुततो, जाळतो, पुसतो असे बोलणारे राष्ट्रवादीचे नेते असल्याचं राज ठाकरे म्हणाले. 

राज ठाकरे गिरगावहून लाईव्ह… पाहा भाषणातील मुद्दे 

  • शिकलेला, वकील उमेदवार गिरगावकरांना मिळाला...
  • बाळासाहेबांच्या केसेस आदिक शिरोडकर सांभाळायचे, 
  • माझ्या सर्व केसेस त्यांचा मुलगा राजेंद्र पाहतो...
  • मलबार हिलचे मनसेचे उमेदवार राजेंद्र शिरोडकरांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा
  • पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावरून टीका
  • आपल्या दौऱ्यांची तुलना भगत सिंह आणि इतरांशी करण्याची गरज काय
  • नरेंद्र मोदींनी इतिहासाचा अभ्यास करावा
  • महाभारताच्या काळात अमेरिका होतं का?
  • राहुल गांधींमुळे मोदी पंतप्रधान झाले
  • बदल घडविण्यासाठी मोदींना निवडून दिलंय
  • पंतप्रधान मोदींवर राजचा हल्लाबोल
  • मतदारांना गृहित धरलं जातंय..
  • खोटे बलात्कारांचे गुन्हे दाखल केले..
  • बलात्कार करा, मुततो, जाळतो, पुसतो... राज ठाकरेंची राष्ट्रवादीवर टीका
  • अजित पवारांची मिमिक्री, जाहिरातीवरून टीका
  • किती वर्ष दिल्लीच्या तालांवर नाचणार?
  • राज्यात राष्ट्रीय पक्ष हवेत कशाला?
  • सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालय, बाथरूम देऊ शकलो नाही..
  • काय केलं या ५४ वर्षात महाराष्ट्रात
  • पर्यटनाकडे राज्यं सरकारचं आणि विरोधकांचंही दुर्लक्ष
  • मराठी माणूस हळुहळू देशाच्या बाहेर जातोय आणि बाहेरचे लोक महाराष्ट्रात येतायेत
  • राज्यकर्त्यांना काहीही देणं- घेणं नाही
  • गोव्याचं पूर्ण अर्थकारण पर्यटनावर
  • आंतरराष्ट्रीय, डोमेस्टिक किती पर्यटक गोव्यात येतात... पण महाराष्ट्र सरकारचं काय?

राज ठाकरे भायकलाच्या सभेतील मुद्दे

  • बलात्काराच्या वक्तव्यावरून, आर. आर. पाटलांवर टीका
  • बलात्कार बुटक्याला थट्टा वाटते का?
  • खोटे बलात्काराचे गुन्हे दाखल केलेत
  • दुसरा म्हणतो धरणात मुततो...
  • मग शरद पवारांची मुलगी म्हणते मंत्र्यांच्या गाड्या फोडा... मग तिच्याच लक्षात आलं आपण त्याच पक्षात आहोत...
  • मग शरद पवार म्हणतात, दोन वेळा मतदान करा, शाई पुसा
  • विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंवर टीका
  • मनसेच्या आमदारांना विरोधी पक्षनेते बोलू देत नाहीत...
  • मी टोलचा विषय धरून ठेवला, तेव्हा ४४ टोलनाके बंद झाले
  • आबांची आणि खड़सेंची राज ठाकरेंनी केली नक्कल
  • महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याकडे दुर्लक्ष

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.