भाजपचा ऐतिहासिक विजय! मोदींची ट्विटरवरून प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून दोन्ही राज्यात भाजपला यश दिल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. मोदींनी या विजयाला ऐतिहासिक विजय म्हटलंय. तसंच कार्यकर्त्यांनाही धन्यवाद म्हटलंय.

Updated: Oct 19, 2014, 06:20 PM IST
भाजपचा ऐतिहासिक विजय! मोदींची ट्विटरवरून प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून दोन्ही राज्यात भाजपला यश दिल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. मोदींनी या विजयाला ऐतिहासिक विजय म्हटलंय. तसंच कार्यकर्त्यांनाही धन्यवाद म्हटलंय.

संपूर्ण जगाला अभिमान वाटावा, असा महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. 

विधानसभा निवडणुकीत भाजपला दोन्ही राज्यांमध्ये चांगलं यश मिळालंय. हरयाणात स्पष्ट बहुमत मिळालंय. तर महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही राज्यांमध्ये झंझावाती प्रचार केला. तब्बल २५ सभा मोदींनी महाराष्ट्रात घेतल्या होत्या. भाजपच्या या यशाचं तेच गमक म्हणावं लागेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.