राज्यात जप्त केलेली रोकड १४ कोटीच्या पुढे

राज्यात मतं विकत घेण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे, यात कोणत्याही एका पक्षावर आरोप करता येणार नाहीत. 

Updated: Oct 13, 2014, 07:15 PM IST
राज्यात जप्त केलेली रोकड १४ कोटीच्या पुढे title=

मुंबई : राज्यात मतं विकत घेण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे, यात कोणत्याही एका पक्षावर आरोप करता येणार नाहीत. 

रविवार संध्याकाळपर्यंत राज्यात १४ कोटी ५ लाख रुपये जप्त करण्यात आले होते. 

४ लाख ९८ हजार ६०० लिटर रूपयांचीअवैध दारू निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आली आहे. तर पोलिसांच्या कारवाईत ७७ लाख ८६  हजार  रुपयाची दारू जप्त करण्यात आली आहे.

राज्यात ९८८ आचारसंहिताभंगचे  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगानी केलेल्या कारवाईत ४४ लाख रुपये, तसेच इतर वस्तूंचा समावेश आहे, तर पोलिसांच्या कारवाई २ कोटी २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.