महात्मा गांधीच्या विचारांच्या विरुद्ध मोदींचे वर्तन - राहुल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधीजी यांच्या विचारांच्या विरोधात वागत आहे. त्यांचे वर्तन गांधींच्या विसंगत आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.  

Updated: Oct 12, 2014, 03:16 PM IST
महात्मा गांधीच्या विचारांच्या विरुद्ध मोदींचे वर्तन - राहुल title=

रामटेक : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधीजी यांच्या विचारांच्या विरोधात वागत आहे. त्यांचे वर्तन गांधींच्या विसंगत आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. 

विदर्भातील रामटेक येथे राहुल गांधी यांची प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे सध्या पेव फुटले आहे. मात्र दुर्दैवाने त्यांच्या विचारधारेची पुजा केली जात नाही, असा टोला राहुल यांनी लगावला.

मोदी आयुष्यभर महात्मा गांधीजी यांच्या विचारधारेशी विसंगत वर्तन करत आले आहेत. आता तेच महात्मा गांधीच्या समाधीसमोर जाऊन नतमस्तक होतात. मात्र त्यांचे विचार घेत नाहीत. महाराष्ट्र हा सर्वच क्षेत्रात गुजरातपेक्षा पुढे आहे, असे सांगत सत्तेवर येताच एनडीएने यूपीए सरकारच्या कार्यकाळात सुरु झालेल्या योजना बंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. १०० दिवसांत काळा पैसा आणू असे सांगणाऱ्या मोदींनी आता १०० दिवसांत एक रुपया तरी परत आणला का, असा सवाल उपस्थित केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.