मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्ष वाढीसाठी उध्दवची कष्ट करण्याची तयारी दिसून येते. त्यांनी महाराष्ट्रभर दौरे घेऊन पक्षाचा विस्तार केलाय, अशी स्तुती पवार यांनी केली.
पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी हे कौतुक केले. लोकसभेत महाराष्ट्रात भाजपला मिळालेल्या यशात शिवसेनेचेही योगदान असल्याची वस्तुस्थिती आहे. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले.
राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे वक्तव्य आक्षेपार्ह आणि निंदनियच असून पक्षाच्या धोरणाशी विसंगत असल्याचे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले. आर. आर. यांचे वक्तव्य चुकीचे असून भावनेत्या भरात त्यांच्याकडून असे विधान झाल्याची कबुलीही पाटील यांनी दिली आहे. तसेच केलेल्या विधानावर त्यांनी माफी मागितल्याने विषय वाढवू नये, असेही पवार म्हणाले.
भाजप ऐक्य तोडतोय
वेगळ्या विदर्भाचे वारे सध्या राज्यात जोरदार वाहत असल्याने या प्रश्नावर निवडणूक आयोगाने जनतेचा कौल घ्यावा आणि जनता जो निर्णय घेईल तिच भूमिका राष्ट्रवादीचीही राहील, असे शरद पवार यावेळी म्हणाले. मात्र, महाराष्ट्र कायम एकसंध राहावा अशीच इच्छा असल्याचेही ते म्हणाले.
- महाराष्ट्राच्या ऐक्यासंदर्भात भाजपची वेगळी भूमिका
- महाराष्ट्र एकसंघ राहावा ही राष्ट्रवादीची भूमिका
- विदर्भाचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कौल घ्यावा
- त्या मतदानाचा आदर राष्ट्रवादी करेल.
शिवाजी महारांच्या नावासोबत मोदींचे
छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि चलो मोदी के साथ, अशा घोषणा करून महाराजांच्या नावाने मत मागण्याची काहीच गरज नव्हती, अशी टीका पवारांनी यावेळी केली.
- लोकांमध्ये तीव्र भावना आहेत
- शिवाजी महारांच्या नावासोबत मोदी यांचं नाव दिलं गेलंय.
- मोदींनी छत्रपती शिवाजी यांच्या नावाचं वापर केलाय
- दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे आजोबा होते हे चुकीचे
- गुजरात सरकारनं सातवीचा इतिहास चुकीचा लिहला
थांबण्याचा निर्णय
- नवीन पिढीनं जबाबदारी घेतली आहे.
- शरद पवार कोणतंही नेतृत्व स्विकारणार नाही
- मी थांबायचा निर्णय घेतलीय
मोदींकडून यंत्रणेचा गैरवापर
- याचे निवडणुकीत प्रचारासाठी भांडवलं केलं. हा वापर चुकीचा
- ते देशाचे पंतप्रधान म्हणून बोलले.
- हा सरकारी यंत्रणेचा गैरवापर आहे
- मोदींनी मेडीसनच्या भाषणाची जाहीरात केली
चव्हाणांवर टीका
- राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होती तर पृथ्वीराज चव्हाण सत्तेच्या खुर्चीवर का बसले?
- शरद पवार यांची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका
तिसरी आघाडी, विचार करू
- माझी देवेगौडा यांची भेट झाली नाही
- पण तिसरी आघाडी संदर्भात अद्याप विचार नाही
- पण पुढे विषय आला तर गांभीर्यानं विचार करू
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.