रेल्वे, विमानाला मागे टाकत मित्रांचा ताफा कारनं निघाला!

राज्यातील भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी वानखेडे स्टेडियमवर भव्य स्टेज उभारण्यात येतोय. महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि वैभवाची झलक या स्टेजवर पहायला मिळणार आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर स्टेज करण्याची जबाबदारी देण्यात आलीय.   

Updated: Oct 30, 2014, 08:41 PM IST
रेल्वे, विमानाला मागे टाकत मित्रांचा ताफा कारनं निघाला! title=

नागपूर/मुंबई: राज्यातील भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी वानखेडे स्टेडियमवर भव्य स्टेज उभारण्यात येतोय. महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि वैभवाची झलक या स्टेजवर पहायला मिळणार आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर स्टेज करण्याची जबाबदारी देण्यात आलीय.   

देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित शपथविधीची जय्यत तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे फडणवीसांच्या शपथविधीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी नागपूरकर मुंबईकडे मोठ्या संख्येने जात आहेत. नागपूर मुंबई या मार्गावरच्या सर्व रेल्वे गाड्यांचं वेटींग ४०० पर्यंत गेलंय. तर विमानाची तिकीटं दुपटी तिपटीने विकली जात आहेत.

रेल्वेची किंवा विमानाची तिकीटं मिळालेली नाहीत त्यामुळं आता अनेक जण कारनं मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. त्यात देवेंद्र यांचे लहानपणापासूनचे मित्र आणि काही नागरिकांचाही समावेश आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.