मुंबई : विधानसभेतील दारूण पराभवानंतर, मनसेचे कार्यकर्ते १ नोव्हेंबर रोजी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेणार होते, मात्र १ नोव्हेंबर रोजी राज ठाकरे हे अहमदनगर जिल्ह्यातील दलित कुटुंब हत्येप्रकरणी पाथर्डीतील जवखेडा गावी असणार आहेत.
आपण पराभवानंतर पुन्हा कामाला लागलो आहोत, हा विश्वास देण्यासाठी कार्यकर्ते राज ठाकरे यांना भेटणार होते. मात्र ही भेट होणार नसल्यानं राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पत्र लिहलंय.
विधानसभेतील पराभवानंतर, राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना लिहलेल्या पत्राचा मजकूर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सहकारी मित्रांनो, www.24taas.com
दिनांक १ नोव्हेंबरला तुमच्यापैकी काहीजण मला येऊन भेटणार होते आणि आपण कामाला लागलो आहोत असं सांगणार होते हे मला समजलं. तुम्ही याल आणि मी नसेन असं व्हायला नको म्हणून मुद्दाम कळवतो आहे. त्यादिवशी मी मुंबईत नाही.
मी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी जवळ असणार आहे. मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की माझ्या पर्यंत तुम्हा सर्वांच्या भावना पोचल्या आहेत. तुमचं माझ्याविषयीचं आणि पक्षाविषयीचं प्रेमही पोचलं आहे. त्याबद्दल शतश: धन्यवाद. माझं काम सुरू आहेच.
आपल्या सर्वांच्या भेटीगाठीही सुरु आहेत. तुम्हीही जिथे आहात तिथे पक्षाचं काम वाढवावं, पक्षाचा विचार घराघरात न्यावा आणि लोकांशी संपर्क ठेवावा, तो वाढवावा.. मी आपल्याला भेटणार आहेच, फक्त त्यादिवशी कामानिमित्त बाहेर आहे आणि तुम्ही आलात आणि मी नाही असं व्हायला नको म्हणून कळवलं ..
जय महाराष्ट्र !!!
आपला ...
राज ठाकरे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.