हा पाहा, 'रामटेक'ला चिकटलेल्या भुजबळांचा नवीन राजमहाल!

‘रामटेक’नंतर जायचं कुठं? असा प्रश्न माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना कदापि पडणार नाही... कारण, तशी तजबीजचं त्यांनी अगोदरपासून करून ठेवलीय. गेल्या १५ वर्षांपासून रामटेकमध्ये आसरा घेतलेल्या भुजबळांनी ‘ला पेटीट फ्लुअर’मध्ये आपलं बस्तान हलवलंय.

Updated: Oct 30, 2014, 02:43 PM IST
हा पाहा, 'रामटेक'ला चिकटलेल्या भुजबळांचा नवीन राजमहाल! title=

मुंबई : ‘रामटेक’नंतर जायचं कुठं? असा प्रश्न माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना कदापि पडणार नाही... कारण, तशी तजबीजचं त्यांनी अगोदरपासून करून ठेवलीय. गेल्या १५ वर्षांपासून रामटेकमध्ये आसरा घेतलेल्या भुजबळांनी ‘ला पेटीट फ्लुअर’मध्ये आपलं बस्तान हलवलंय.

आघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे छगन भुजबळांनी सत्तेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ‘रामटेक’ हा शासकीय बंगला रिकामा केलाय. शासकीय बंगले सोडताना मंत्र्यांच्या आन-बान-शानचा प्रश्न निर्माण होतो, मात्र भुजबळ याला अपवाद ठरलेत. सरकारी बंगला सोडून भुजबळ राजमहालालाही लाजवेल अशा एका इमारतीत वास्तव्यास असणारेत..

सांताक्रूजच्या कॉन्व्हेन्ट अ‍ॅव्हेन्यू मार्गावरील आलिशान अशा नऊ मजली 'ला पेटीट फ्लुअर' या टोलेजंग इमारतीत भुजबळ वास्तव्यास आहेत. संपूर्ण भुजबळ कुटुंबच या ठिकाणी वास्तव्यास असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ही नऊ मजली संपूर्ण इमारतच भुजबळांची आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीलाचा एक मजला असणार आहे.. रिलायन्सच्या मुकेश अंबानी यांच्या अँटोलिया प्रमाणेच सर्व सुख सुविधांनी सज्ज असा 'ला पेटीट फ्लुअर' भुजबळ कुटुंबियांचा नवा पत्ता असणारए..त्यामुळेच सत्ता गेली असली तरी भुजबळांची शान कायम आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.. 

‘रामटेक’चा इतिहास…
काँग्रेस आघाडी सरकारमधील पहिले उपमुख्यमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना १९९९ मध्ये ‘रामटेक’ हा बंगला वितरीत झाला होता. गेली १५ वर्ष भुजबळ हे ‘रामटेक’वर मुक्कामाला होते. कोटय़वधी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याप्रकरणी भुजबळ यांना २००३ मध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मंत्रिपदी नसतानाही भुजबळ यांनी ‘रामटेक’चा ताबा सोडला नव्हता. 

२००४ मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर भुजबळ यांनी ‘रामटेक’वर राहणे पसंत केले होते. २००४ साली उपमुख्यमंत्री झालेल्या आर. आर. पाटील यांनी सुरूवातीला ‘रामटेक’ची मागणी करून पाहिली. परंतु, भुजबळांनी ‘रामटेक’ सोडण्यास नकार दिल्याने आर. आर. यांना ‘चित्रकूट’वरच बिऱ्हाड थाटावं लागलं होतं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.