औरंगाबाद मध्य मतदारसंघात सख्खे मित्र झाले पक्के वैरी!

आघाडीतील बिघाडानंतर आणि युतीच्या घटस्फोटानंतर अनेक जुने मित्र आता एकमेकांचे वैरी म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. औरंगाबादेतही असंच काहीसं चित्र आहे. एकेकाळचे सख्खे मित्र असलेले किशनचंद तनवाणी आणि प्रदीप जैस्वाल आता भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. म्हणतात ना ‘जंग और प्यार मे सब मुमकीन है’ त्याचंच एक उदाहरण पाहूयात.

Updated: Sep 29, 2014, 07:07 PM IST
औरंगाबाद मध्य मतदारसंघात सख्खे मित्र झाले पक्के वैरी! title=

औरंगाबाद: आघाडीतील बिघाडानंतर आणि युतीच्या घटस्फोटानंतर अनेक जुने मित्र आता एकमेकांचे वैरी म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत. औरंगाबादेतही असंच काहीसं चित्र आहे. एकेकाळचे सख्खे मित्र असलेले किशनचंद तनवाणी आणि प्रदीप जैस्वाल आता भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. म्हणतात ना ‘जंग और प्यार मे सब मुमकीन है’ त्याचंच एक उदाहरण पाहूयात.

प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी... एकेकाळचे सख्खे मित्र... शिवसेनेचा कुठलाही कार्यक्रम असो... खांद्याला खांदा लावून बसणारे हे स्नेही... मात्र आता राजकारणामुळं सख्खे वैरी झालेत. निवडणुका लढण्याची नशाच काही और असते असं म्हणतात... त्याच नशेत वेगळे झालेले हे मित्र... 

किशनचंद तनवाणींनी शिवसेनेत असताना नगरसेवकापासून ते महापौर आणि आमदारपदापर्यंत मजल मारली. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांना विधानसभेचे वेध लागले आणि त्यातूनच त्यांनी प्रदीप जैस्वालांविरोधात काम करणं सुरू केलं. मातोश्रीकडे औरंगाबाद मध्यसाठी तिकीट मागितलं मात्र ते न मिळाल्यानं त्यांनी भाजपचा रस्ता धरला आणि आता एकेकाळचा हा कट्टर शिवसैनिक शिवसेनेच्याच पराभवाची भाषा करतोय. तसंच आपण शिवसेनेच्या मित्रपक्षांसोबतच असल्याची खोचक टीकाही करतोय.

भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं शिवसेना मात्र तनवाणींवर चांगलीच नाराज आहे. आता त्यांना माफी नाही असा पवित्रा शिवसेनेनं घेतलाय.

सतत एकमेकांची स्तुती करणारे हे नेतेच आता एकमेकांविरोधात मैदानात उतरल्यामुळं औरंगाबाद मध्य मतदारसंघातील लढाई आता केवळ दोन उमेदवारांमधील नाही तर शिवसेनेच्या प्रतिष्ठेची झालीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.