मुख्यमंत्री भंगार मॉडेल विकायला काढले - गडकरी

 मुख्यमंत्री भंगार मॉडेल असून बाजारात विकायला काढले तर विकलेही जाणार नाही, अशी घणाघाती टीका नितीन गडकरी यानी नाशिकमध्ये केली. 

Updated: Sep 29, 2014, 05:40 PM IST
मुख्यमंत्री भंगार मॉडेल विकायला काढले - गडकरी title=

सटाणा, नाशिक:  मुख्यमंत्री भंगार मॉडेल असून बाजारात विकायला काढले तर विकलेही जाणार नाही, अशी घणाघाती टीका नितीन गडकरी यानी नाशिकमध्ये केली. 

नाशिक जिल्ह्यातील सटाणा इथं भाजपाचे उमेदवार दिलीप बोरसे यांच्या प्रचारासाठी नाशिक जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कारभाराला धारेवर धरत शेवटच्या पंधरा दिवसात फाईल्स क्लिअर का केल्या? असा सवालही नितीन गडकरींनी केलाय. 

यापूर्वी काल चांदडवमध्ये बोलतांना गडकरींनी आबा, बाबा आणि दादांनी मिळून महाराष्ट्राचं वाटोळं केलं, या शब्दात त्यांच्यावर टीका केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.