माधुरीला धमकी देणारा 'छोटा राजन' अटकेत

'मी छोटा राजन बोलतोय' असं म्हणून बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित - नेने हिच्याकडे खंडणी मागणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी आज अटक केलीय.

Updated: Dec 4, 2014, 09:00 PM IST
माधुरीला धमकी देणारा 'छोटा राजन' अटकेत title=

मुंबई : 'मी छोटा राजन बोलतोय' असं म्हणून बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित - नेने हिच्याकडे खंडणी मागणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी आज अटक केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, छोटा राजनच्या नावावर या तरुणाने माधुरीकडे पैशांची मागणी केली होती. पैसे मिळाले नाही तर जीवे मारण्याचीही धमकी त्यानं दिली होती. 

पण, माधुरीने मात्र या धमकीला न घाबरता पोलिसांत तक्रार दाखल केली... पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा छडा लावला तेव्हा हा तरुण या प्रकरणात सहभागी असलेला आढळला. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.