यूट्यूब गोंधळलं... या 'व्हिडिओ'ची मोजदादच विसरलं!

विराट कोहलीपासून ते क्रिस गेलपर्यंत अनेक लोकांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडलं ते कोरियन गायक साइ याच्या गंगनम स्टाईलनं... याच गंगनम स्टाईलच्या व्हिडिओनं यूट्यूबच्याही तोंडचं पाणी पळवलंय... 

Updated: Dec 4, 2014, 09:32 PM IST
यूट्यूब गोंधळलं... या 'व्हिडिओ'ची मोजदादच विसरलं! title=

नवी दिल्ली : विराट कोहलीपासून ते क्रिस गेलपर्यंत अनेक लोकांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडलं ते कोरियन गायक साइ याच्या गंगनम स्टाईलनं... याच गंगनम स्टाईलच्या व्हिडिओनं यूट्यूबच्याही तोंडचं पाणी पळवलंय... 

हा व्हिडिओ आत्तापर्यंत एवढ्या लोकांनी पाहिलाय की त्यामुळे यूट्यूब मोजदादच विसरलंय. हिटसची मोजदाद करता करता यूट्यूबचं काऊंटर सुस्तावलाय. खुद्द यूट्यूबनंच याची घोषणा केलीय.

2012 साली दक्षिण कोरियाचा गायक साइ याची घोडेस्वारीप्रमाणे नाचण्याची स्टाईल अनेकांच्या पसंतीस उतरली होती. या व्हिडिओनं अल्पावधीतच लाखो लोकांच्या हृद्यात स्थान मिळवलं होतं. आयपीएलमध्ये हेच गाणं जोरावर होतं.

हिटसमध्ये या आठवड्यात हा व्हिडिओ सर्वोच्च स्थानावर पोहचलाय. पुढे काय याच्याबद्दल अजून विचार करण्यात आलेला नाही. 

यू ट्यूबनं दिलेल्या माहितीनुसार, या गाण्याचा अधिकृत व्हिडिओ आत्तापर्यंत 215 करोड लोकांनी पाहिलाय.

जगभरातील व्हिडिओ दाखवणाऱ्या यूट्यूब या सोशल साईटचा काऊंटर 32 बिटसनं बनवण्यात आला होता. याचाच अर्थ यामध्ये जास्तीत जास्त 2 अरब 14 करोड, 74 लाखांहून थोडीच बहुत संख्या दिसू शकते. यापुढील अंक मात्र दिसू शकणार नाहीत.

पण, गूगलच्या इंजिनिअर्सनं आता यामध्ये 64 बिट इंटिगर लावलेत... त्यामुळे आता 9,223,372,036,854,775,808 पर्यंत व्हिडिओ हिटसची मोजदाद करू शकतो.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.