कोण म्हणतं विराट-अनुष्काचं ब्रेकअप झालं, ते तर करताहेत सेलिब्रेशन

 अनुष्का पुन्हा विराटच्या आयुष्यात आली ही बातमी अनेकांना रुचणार नाही, पटणार नाही किंवा तिच्यावर वाईट प्रतिक्रिया करणाऱ्यांची संख्याही वाढू शकते. पण ज्यांनी सांगितलं या दोघांचे ब्रेकअप झालं त्यांन दोघांनी तोंडावर पाडलं आहे. 

Bollywood Life | Updated: May 19, 2016, 03:03 PM IST
कोण म्हणतं विराट-अनुष्काचं ब्रेकअप झालं, ते तर करताहेत सेलिब्रेशन title=

मुंबई :  अनुष्का पुन्हा विराटच्या आयुष्यात आली ही बातमी अनेकांना रुचणार नाही, पटणार नाही किंवा तिच्यावर वाईट प्रतिक्रिया करणाऱ्यांची संख्याही वाढू शकते. पण ज्यांनी सांगितलं या दोघांचे ब्रेकअप झालं त्यांन दोघांनी तोंडावर पाडलं आहे. 

कुठे झाली भेट 

आयपीएलमध्ये एका सिझनमध्ये चार शतक लगावण्याचा विक्रम करणाऱ्या विराट कोहली सोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा दिसली आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने  गुजरात लायन्सवर विजय मिळवल्यानंतर झालेल्या सेलिब्रेशनला अनुष्का विराटला शुभेच्छा देण्यासाठी आली होती.

फोटो काढले दोघांनी

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 14 मे रोजी गुजरात लायन्सचा धुव्वा उडवला. त्यानंतर आरसीबीतर्फे डिनरचं आयोजन करण्यात आलं. ईडीओ या जपानी रेस्टॉरंटमध्ये झालेल्या सेलिब्रेशनला अनुष्काही उपस्थित होती. विशेष म्हणजे दोघांनी शेफसोबत फोटोही काढले.

यापूर्वीही विराट-अनुष्का एकत्र दिसले होते

विराट आणि अनुष्का यापूर्वीही वांद्र्याच्या एका पबमध्ये एकत्र डिनर करताना दिसले होते.