पत्रकार परिषदेत फोन कॉलने काजोल घाबरली

बॉलीवूडची अभिनेत्री काजोल आज पत्रकार परिषदेत होती. काजोलची बहिण तनिषा मुखर्जीचं नाटक द ज्युरीसाठी ही पत्रकार परिषद होती. 

Updated: Aug 9, 2015, 08:43 PM IST
 पत्रकार परिषदेत फोन कॉलने काजोल घाबरली   title=

मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री काजोल आज पत्रकार परिषदेत होती. काजोलची बहिण तनिषा मुखर्जीचं नाटक द ज्युरीसाठी ही पत्रकार परिषद होती. 

मात्र या दरम्यान काजोलचा फोन सतत वाजत होता, काजोलने हा फोन घेतला पण काजोलच्या चेहऱ्यावर घबराट दिसून आली, यानंतर काजोलने सर्वांची माफी मागत मला गेलं पाहिजे असं सांगितलं, एवढंच नाहीतर ड्रायव्हरला मराठीत सांगितलं, 'गाडी मी चालवणार'.

यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलतांना काजोल म्हणाली होती, मी तनिषाच्या भूमिकेबद्दल उत्साही आहे, आणि मला विश्वास आहे ती नक्की चांगलं करणार आहे.

या पत्रकार परिषदेत काजोलची आई तनुजा, अभिनेत्री जूही चावला, लारा दत्ता, टेनिस खेळाडू महेश भूपती, क्रिकेटर अजित आगरकर, मधु शाह, मोनीष बहलसह अनेक जण उपस्थित होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.