मुंबई : तुम्ही कधी सलमानला ऑन स्क्रीन किसींग सीन देताना पाहिलंत? नाही ना... खरं म्हणजे, सलमानसाठी किसींग सीनमधूनच रोमान्स दाखवता येतो असं नाही, नुकताच आपल्या 'रोमान्स'च्या कन्सेप्टबद्दल आणि आपल्या रिलेशनशीपबद्दल सलमान भरभरून बोलला.
मी लाजाळू नाही फक्त मला रोमान्स दाखवण्यासाठी किसिंग सीन देण्याची गरज वाटत नाही, असं सलमान म्हणतोय. सलमान आणि सोनम कपूर यांचा 'प्रेम रतन धन पायो' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
सलमानला कमिटमेंटची का भीती वाटते?
या प्रश्नावर सलमान म्हणतो, मी विश्वासार्ह नाही... म्हणजेच माझ्यावर कुणीही भरवसा ठेऊ शकत नाही. म्हणून असेल कदाचित...
रोमान्स म्हणजे काय?
यावर, सलमान म्हणाला, मी लोकांसमोर माझ्या गर्लफ्रेंडचा हातही पकडू शकत नाही. पब्लिकमध्ये मी रोमान्स करू शकत नाही. माझ्या घरी असं कधीही घडलेलं नाही. माझ्या वडिलांनी असं कधीही केलेलं नाही.
शिवाय, डेट म्हणून डिनरला जाणंदेखील सलमानला आवडत नाही. आपण जेवतोय, आणि लोक आपले फोटो घेतायत हे आपल्याला आवडत नसल्याचं सलमान म्हणतो.
सलमानचे अनुभव कथन...
यावेळी आपल्या रोमान्टिक जीवनाचे काही किस्सेही सलमाननं शेअर केलं. मी दोन वेळ कॅन्डल लाईट डिनरसाठी गेलो... दोन्ही वेळेस लग्नापर्यंत गोष्टी पोहचल्या... पण दोन्ही वेळेस भांडणं होऊन रिलेशनशीप तिथचं संपलं... असंही सलमाननं हसत हसत सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.