मुंबई : एका तरुणानं छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि रिअॅलिटी शोची होस्ट गौहर खान हिच्या कानाखाली ठेऊन दिली... आणि हीच गोष्ट अनेक ठिकाणी चर्चिली गेली.
काहींनी धर्माच्या नावाखाली गौहरचं वागणं, तिचा पेहराव चुकीचा ठरवला तर काहींनी या तरुणाचा हा हातातायीपणा असल्याचा निर्वाळा दिला... पण, अशा घटना का घडतायत...? समाजाच्या ठेकेदारांकडून आणि रखवालदारांकडून 'मॉरल पोलिसिंग' रोखणार कसं? मुळात, आपल्याला एखाद्या व्यक्तीचं वागणं पटलं नाही तर हिंसाचाराचा मार्ग अवलंबून त्या व्यक्तीला आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला लावणं, कितपत बरोबर?
अभिनेत्री गौहर खान हिला नेमकं अशा प्रकारच्या हिंसेला का सामोरं जावं लागलं? याबद्दलचा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर फिरतोय. एका सामान्य तरुणानं आपल्याला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय हे या व्हिडिओत सांगितलंय. पण, या तरुणाचा हा व्हिडिओ भलताच लोकप्रिय झालाय... का ते तुम्हीच पाहा...
व्हिडिओ पाहा -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.