‘सलमान’चं नाव ऐकून भडकली ऐश्वर्या!

बॉलिवूडची ‘यमी मम्मी’ म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय बच्चन आजही एक नाव ऐकलं की चिडते... ते नाव आहे ‘सलमान’... 

Updated: Dec 10, 2014, 01:47 PM IST
‘सलमान’चं नाव ऐकून भडकली ऐश्वर्या! title=

मुंबई : बॉलिवूडची ‘यमी मम्मी’ म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय बच्चन आजही एक नाव ऐकलं की चिडते... ते नाव आहे ‘सलमान’... 

हेच नाव ऐश्वर्याला आजही खूप त्रासदायक वाटतंय. याचा प्रत्यय नुकताच आला. एका वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, नुकतीच ऐश्वर्याला शाहरजाहमध्ये होणाऱ्या ‘एशियाव्हिजन मुव्ही अवॉर्ड’मध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झाली होती. या कार्यक्रमात ऐश्वर्याला ‘आयकॉन ऑफ इंडियन सिनेमा’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता.

सूत्रांनी दिलेल्या बातमीनुसार, इथं याच कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या इतर नावांची सूची ऐश्वर्यानं मिळवली. यामध्ये एक नाव ‘सलमान’चंही होतं... झालं... ऐश्वर्या भडकली... तीनं दुबईला येण्यासच नकार देऊन टाकला.

पण, नंतर मात्र आयोजकांनी ऐश्वर्याचा गैरसमज दूर करत हा ‘सलमान’ म्हणजे ऐश्वर्या समजतेय तो सलमान नसून मल्ल्याळम सिनेस्टार दुलकेर सलमान आहे असं सांगितलं... तेव्हा बाईंचा पारा कुठे कमी झाला. मग तिनं अभिनेत्याचं संपूर्ण नाव का लिहिण्यात आलं नाही? असा प्रश्नही तिनं विचारला.

दुलकेर सलमान अभिनेते ममूटी यांचा मुलगा आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो मल्याळी सिनेमांत काम करतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.