तेजश्री म्हणतेय 'तुझा आधार'...

'ओली की सुकी' चित्रपटातलं 'तारणहार कृष्णा तुझा आधार' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं हे गाणं ट्विटरवरून आपल्या चाहत्यांशी शेअर केलंय.   

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2017, 05:35 PM IST
तेजश्री म्हणतेय 'तुझा आधार'...  title=

मुंबई : 'ओली की सुकी' चित्रपटातलं 'तारणहार कृष्णा तुझा आधार' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं हे गाणं ट्विटरवरून आपल्या चाहत्यांशी शेअर केलंय.   

आयुष्यात येणाऱ्या अनपेक्षित ट्विस्टला 'विषय गंभीर तिथं खंबीर' होत सामोरे जाणाऱ्या स्टायलिश 'रावडी गँग'ची हजरजवाबी बोल-बच्चनगिरी या सिनेमातून दिसणार आहे. प्रत्येक संकटाला आत्मविश्वासपूर्वक परतवून लावण्याची भाषा बोलणारी अतरंगी मुले, अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची त्यांच्याप्रती असणारी तळमळ यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढत आहे. 

तेजश्री प्रधानसह या चित्रपटात वर्षा उसगावकर, भार्गवी चिरमुले, संजय खापरे, शर्वरी लोहोकरे, सुहास शिरसाट, बालकलाकार चिन्मय संत आणि १० ते १२ बाल-कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आनंद गोखले लिखित व दिग्दर्शित आणि वैभव जोशी निर्मित 'ओली की सुकी' हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.