पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : 'व्हेंटिलेटर'ची बाजी!

नुकत्याच झालेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ठ पटकथेचा पुरस्कार पटकावत प्रियांकाच्या 'व्हेंटिलेटर'नं बाजी मारलीय. 

Updated: Feb 14, 2017, 05:18 PM IST
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : 'व्हेंटिलेटर'ची बाजी! title=

पुणे : नुकत्याच झालेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ठ पटकथेचा पुरस्कार पटकावत प्रियांकाच्या 'व्हेंटिलेटर'नं बाजी मारलीय. 

प्रियांका चोप्राच्या 'पर्पल पेबल पिक्चर्स' या निर्मिती संस्थेची पहिला मराठी सिनेमा 'व्हेंटिलेटर' गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. डॉ. मधु चोप्रा निर्मित या चित्रपटाला यंदाच्या पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला.

व्हेंटिलेटर सिनेमाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनीच या सिनेमाच्या पटकथेवरही काम केलं होतं. अनेक मराठी कलाकारांसह बॉलिवूड गाजवणाऱ्या आशुतोष गोवारीकर आणि बमन इराणी यांच्याही सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

कौटुंबिक मूल्ये, प्रथा, परंपरा आणि नातेसंबंध यावर 'व्हेंटिलेटर' सिनेमाने प्राकाशझोत टाकला होता. सिनेमाचं रसिकांनी भरभरून कौतुक होते.

'या सिनेमाचा विषय माझ्या हृदयाला भिडला. सिनेमाचा विषय प्रियंका, राजेश आणि आम्हां सगळ्यांनाच खूप भावला... या चित्रपटाची निवड न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवासाठीही झालीय, अशी माहिती चित्रपटाच्या निर्मात्या मधू चोप्रा यांनी दिलीय.  

तर, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेल्या सर्वोत्कृष्ठ पटकथेचा हा पुरस्कार माझा पहिला पुरस्कार आहे, याचा मला अतिशय अभिमान वाटतो... अशी भावूक प्रतिक्रिया राजेश मापुस्कर यांनी दिलीय.