वरुण, जॉन आणि जॅकलीनचा सैराटवर डान्स

आर्ची-परश्याच्या प्रेमकहाणीवर आधारित सैराट चित्रपटाची हवा अद्याप प्रेक्षकांमध्ये कायम आहे. मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर बॉलीवूडकरांनाही सैराटने याडं लावलं. डान्सचा व्हिडीओ बातमीच्या खाली

Updated: Jun 26, 2016, 08:43 AM IST
वरुण, जॉन आणि जॅकलीनचा सैराटवर डान्स title=

मुंबई : आर्ची-परश्याच्या प्रेमकहाणीवर आधारित सैराट चित्रपटाची हवा अद्याप प्रेक्षकांमध्ये कायम आहे. मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर बॉलीवूडकरांनाही सैराटने याडं लावलं. डान्सचा व्हिडीओ बातमीच्या खाली

बॉलीवूड चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळीही सैराटमधील झिंगाट गाणं वाजताना दिसतंय. बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम, वरुण धवन आणि जॅकलीन फर्नांडिझ स्टारर ढिशूम या चित्रपटाच्या निमित्ताने हे कलाकार नागपूरमध्ये आले होते. 

यावेळी झिंगाट या गाण्यावर वरुण, जॅकलीन सैराट होऊन नाचले. झिंगाट गाण्यावर जबरदस्त डान्स करुन वरुणने तेथे उपस्थित तरुणाईची मने जिंकून घेतली. जॅकलीननेही या गाण्यावर काही काळ ठेका धरला.

याआधीही यू कॅन डान्स या शोमध्येही हाऊसफुल्ल ३च्या प्रमोशनच्यावेळी रितेश देशमुख, माधुरी दिक्षीत यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला होता.