मॅड्रिड : आयफा अवॉर्डसाठी बहुतेक बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्री स्पेनमध्ये पोहोचले आहेत. या सोहळ्यामध्ये परफॉर्म करण्यासाठी प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणनं चार मिनिटांसाठी 1.3 कोटी रुपये घेतले आहेत. मिड डे या वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे.
या सोहळ्याच्या आयोजकांनी स्टेज परफॉर्मन्ससाठी वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना विचारलं होतं. एवढचं नाही तर मॅड्रिडमध्ये कोणता सेलिब्रिटी फेमस आहे, हे देखील पाहण्यात आलं होतं. या लिस्टमध्ये प्रियांका आणि दीपिकाला सर्वाधिक पसंती मिळाली, यामुळे या दोघींना एवढी रक्कम द्यायला आयोजक तयार झाले.
प्रियांका आणि दीपिका हॉलीवूडमधून नुकतंच काम करून आल्या आहेत, यामुळे दोघींची ब्रॅन्ड व्हॅल्यू वाढली आहे. या दोन्ही अभिनेत्री आता त्यांचे हॉलीवूड चित्रपट रिलीज व्हायची वाट पाहत आहेत.