उडता पंजाबची जबरदस्त कमाई

गेल्या काही दिवसांत सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेल्या 'उडता पंजाब' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कामाई केली आहे. 

Updated: Jun 25, 2016, 01:04 PM IST
उडता पंजाबची जबरदस्त कमाई title=

मुंबई : गेल्या काही दिवसांत सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेल्या 'उडता पंजाब' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कामाई केली आहे. 

या सिनेमाने आतापर्यंत 45.70 कोटींचा गल्ला कमाविला आहे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने १०.०५ कोटीची कमाई केली. तर शनिवारी ११.२५ कोटी, रविवारी १२.५० कोटी, ,सोमवारी ४.०५ कोटी, मंगळवारी ४ कोटी, बुधवारी ३.४० कोटी कमाई केली.वादाचा सिनेमाला चांगलाच फायदा झाला

ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या पंजाबमधील तरुणाईच्या स्थितीवर आधारित उडता पंजाबची कथा आहे. प्रदर्शनाआधीच चित्रपटावरुन मोठा वाद झाला होता. अखेर हा वाद शमल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.