या आठवड्यातील अव्वल 5 मालिका

मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. झी मराठी तसेच कलर्स मराठीवरील कोणत्या मालिका आहेत अव्वल हे बार्क इंडियाने नुकतेच जाहीर केलेय. 

Updated: Sep 9, 2016, 09:01 AM IST
या आठवड्यातील अव्वल 5 मालिका title=

मुंबई : मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. झी मराठी तसेच कलर्स मराठीवरील कोणत्या मालिका आहेत अव्वल हे बार्क इंडियाने नुकतेच जाहीर केलेय. 

बार्कने जाहीर केलेल्या यादीनुसार अव्वल 5 सीरियलमध्ये झी मराठी वाहिनीच्या 4 सीरियल्सचा समावेश आहे. तर कलर्स वाहिनीवरील एका सीरियल्सचा समावेश आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारा शो म्हणजे चला हवा येऊ द्या  हा शो अव्वल स्थानी आहे. शिव आणि गौरीच्या प्रेमकहाणीवर आधारित काहे दिया परदेस ही मालिका दुसऱ्या स्थानी आहे. 

कजाग सासूच्या कारस्थानांना जोरदार प्रत्युत्तर देणारी स्वानंदीची नांदा सौख्य भरे ही मालिका तिसऱ्या स्थानी आहे. संत तुकाराम आणि अवली यांच्या संसारगाथेवर आधारित तु माझा सांगाती ही मालिका चौथ्या स्थानी आहे. तर आबालवृद्धांपासून मोठ्यांनाही आवडणारी मालिका जय मल्हार पाचव्या स्थानी आहे.