कपिलचा 'कॉमेडी नाईट विथ कपिल' पुन्हा 'कलर्स'वर

स्टॅन्ड कॉमेडीयन आणि अभिनेता कपिल शर्मा याच्या फॅन्ससाठी ही खुशखबर आहे. कपिलचा 'कॉमोडी नाईट विथ कपिल' हा कार्यक्रम पुन्हा एकदा कलर्सवर पाहायला मिळणार आहे. 

Updated: Sep 8, 2016, 09:45 PM IST
कपिलचा 'कॉमेडी नाईट विथ कपिल' पुन्हा 'कलर्स'वर title=

मुंबई : स्टॅन्ड कॉमेडीयन आणि अभिनेता कपिल शर्मा याच्या फॅन्ससाठी ही खुशखबर आहे. कपिलचा 'कॉमोडी नाईट विथ कपिल' हा कार्यक्रम पुन्हा एकदा कलर्सवर पाहायला मिळणार आहे. 

काही महिन्यांपूर्वी कलर्स वाहिनीसोबत झालेल्या वादानंतर कपिल शर्मानं 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' हा कार्यक्रम सोडला होता. त्यानंतर या चॅनेलनं या कॉमेडी सीरिजचे सगळे एपिसोड सोशल मीडिया आणि आपल्या वेबसाईटवरून हटवले होते. परंतु, आता मात्र या चॅनलनं या कार्यक्रमाचे जुने भाग आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा दाखवायला सुरूवात केलीय. 

यामुळे कृष्णा अभिषेक आणि भारतीच्या टीमला मात्र जोरदार धक्का बसल्याचं सांगण्यात येतंय. कपिलनं कार्यक्रम सोडल्यानंतर कृष्णा, भारती आणि टीमनं 'कॉमेडी नाईटस लाइव्ह'ची सुरुवात केली होती. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर चॅनलनं जुने भाग पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय. 

गेल्या आठवड्यात या चॅनलवर शाहरुख-काजोलचा भाग दाखवण्यात आला होता. कलर्स सोडल्यानंतर कपिल शर्मा आता सोनी टीव्हीवर 'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतोय.