जंगल बुक कमाईच्या बाबतीत अजूनही पुढेच

जंगल बुक सिनेमा रिलीज होण्यास दोन आठवडे उलटले आहेत, तरीही कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर जंगल बुक एका नंबरवर आहे.

Updated: Apr 27, 2016, 08:52 AM IST
जंगल बुक कमाईच्या बाबतीत अजूनही पुढेच title=

मुंबई : जंगल बुक सिनेमा रिलीज होण्यास दोन आठवडे उलटले आहेत, तरीही कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर जंगल बुक एका नंबरवर आहे.

भारतात ८ एप्रिल रोजी रिलीज झालेल्या, जंगल बुकने आतापर्यंत १५० कोटी रूपयांची कमाई केली आहे.

एपी न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसाप डिज्नीचा नवा सिनेमा, 'दी हंटसमॅन : विंटर वार' 'जंगल बुक'च्या तुलनेत कमाईत फारच मागे आहे.

थिएटर्समध्ये जंगल बुकने आपली पकड कायम केली आहे, 'दी हंटसमॅन : विंटर वार' मध्ये दिग्गज कलाकारांची फळी असली तरी जंगल बुकने या सिनेमाला मागे टाकलं आहे.

कॉमस्कोरनुसार तिकिट वितरणाच्या हिशेबानुसार जंगल बुकने आतापर्यंत ६०.०८ मिलियन डॉलरची कमाई केली आहे.

यात हंटसमॅन : विंटर वार हा सिनेमा आतापर्यंत केवळ २०.०१ मिलियन डॉलर कमाई करू शकला आहे.