स्वाइन फ्लू : सोनम कपूरला उपचारांनंतर डिस्चार्ज

स्वाइन फ्लूने बाधित बॉलिवूड अॅक्ट्रेस सोनम कपूरला कोकिलाबेन हॉस्पिटलमधून उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर सोनम कपूरने डिस्चार्ज मिळाल्याचं ट्‌विट  केलं. 

Updated: Mar 7, 2015, 10:09 PM IST
स्वाइन फ्लू : सोनम कपूरला उपचारांनंतर डिस्चार्ज title=

मुंबई : स्वाइन फ्लूने बाधित बॉलिवूड अॅक्ट्रेस सोनम कपूरला कोकिलाबेन हॉस्पिटलमधून उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर सोनम कपूरने डिस्चार्ज मिळाल्याचं ट्‌विट  केलं. 

राजकोट येथे 'राम रतम धन पायो' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान ससोनम कपूरला स्वाईन फ्लू झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर तिच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने तिला रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. 

सोनम कपूरने ट्‌विट केले, की रुग्णालयातून सुट्टी... होम स्वीट होम! आधीपेक्षा आता मला खूप बरे वाटत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.