महिला का शिव्या देऊ शकत नाहीत? - मल्लिका शेरावत

मल्लिका शेरावत म्हटलं की चर्चा तर होणारच... आता ती चर्चेत आहे ते तिच्या बोल्ड रूपासाठी नाही तर वेगळ्याच गोष्टीसाठी...

Updated: Mar 7, 2015, 01:58 PM IST
महिला का शिव्या देऊ शकत नाहीत? - मल्लिका शेरावत title=

मुंबई : मल्लिका शेरावत म्हटलं की चर्चा तर होणारच... आता ती चर्चेत आहे ते तिच्या बोल्ड रूपासाठी नाही तर वेगळ्याच गोष्टीसाठी...

'डर्टी पॅालिटिक्स' या आगामी चित्रपाटात मल्लिका एका गावाकडच्या अडाणी मुलीच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे... आणि यातील काही सीन्समध्ये तिच्या तोंडी तिनं अर्वाच्च शिव्यांही प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत.

आणि यामुळेच मल्लिका सध्या हैराण झालीय... कारण, याबद्दल तिला अनेक प्रश्न विचारण्यात येत आहे.... त्यामुळे, तिनं आता तिच्या बोल्ड व्यक्तीमत्त्वाप्रमाणे या प्रश्नांना सामोरं जायचं ठरवलंय. 

'जेव्हा पडद्यावर हिरो अपशब्दांचा वापर करतो, तेव्हा त्याला प्रेक्षकांकडून काही प्रश्न विचारले जात नाहीत... उलट टाळ्या वाजवतात... आणि 'क्या डॉयलॉग मारा है' म्हणत त्याला प्रतिसादही देतात... मग, हिरोईन्स जेव्हा असे शब्द वापरतात तेव्हा लोक प्रश्न विचारणं सुरू करतात... महिला का शिव्या देऊ शकत नाहीत? हिरोईन्सच्या बाबतीत हा दुजाभाव का?' असं म्हणत मल्लिकानं प्रश्न विचारणाऱ्यांची तोंडच बंद केलीत. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.