सुशांत सिंग राजपूतने 'तिच्यासोबत' साजरी केली होळी

'पवित्र रिश्ता' फेम सुशांत सिंग राजपूत आणि त्याची पाच वर्षांपासून गर्लफ्रेंड असलेली अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्या नुकत्याच धडकल्या. त्यांच्या चाहत्यांचा यामुळे हिरमोड झाला असला तरी सुशांत सिंग राजपूत मात्र एका वेगळ्याच सुंदरीसोबत होळी खेळण्यात दंग होता.

Updated: Mar 26, 2016, 09:21 AM IST
सुशांत सिंग राजपूतने 'तिच्यासोबत' साजरी केली होळी title=

मुंबई : 'पवित्र रिश्ता' फेम सुशांत सिंग राजपूत आणि त्याची पाच वर्षांपासून गर्लफ्रेंड असलेली अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्या नुकत्याच धडकल्या. त्यांच्या चाहत्यांचा यामुळे हिरमोड झाला असला तरी सुशांत सिंग राजपूत मात्र एका वेगळ्याच सुंदरीसोबत होळी खेळण्यात दंग होता.

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससोबत सुशांत सिंग होळी खेळत होता. एका प्रसिद्ध मनोरंजन वाहिनीने या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमात सुशांत आणि जॅकलीन खूप धमाल करताना दिसले.

या पार्टीत त्यांच्यासोबत इतर काही कलाकारही हजर होते. पूनम पांडे, पत्रलेखा, रणदीप हूडा, स्वरा भास्कर, संभावना सेठ आणि अनू मलिकही तिथे होते. पण, सुशांत आणि जॅकलीन यांच्यातील मैत्रीने सर्वांच्याच भूवया उंचावल्या गेल्या.