मुंबई : सध्या बॉलिवूडमधून ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. मात्र, सिनेमात बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत ही लवकरच विवाहाच्या बोहल्यावर चढत आहे.
मल्लिका सध्या सिरले ऑक्सेनफॅन्स या फ्रेंच व्यावसायिकासोबत डेटिंग करत आहे. मल्लिका आणि सिरले हे गेले काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी आपले प्रेम जाहीर केले.
मल्लिकाने नुकतेच आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. तिने यावेळी एक संदेशही दिलाय, प्रेमात पडणे हा जगातील उत्तम अनुभव आहे.
दरम्यान, व्हॅलेन्टाइन डेला सिरले याने मल्लिकाला एक आलिशान कार भेट दिली होती. या दोघांनी आता एक पाऊल पुढे टाकत लग्नाचा विचार केलाय. ते लवकरच विवाहबंधनात अडणार असल्याचे कळते.