...म्हणून सुरेश वाडकरांनी दिला होता माधुरीला लग्नासाठी नकार

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा काही दिवसांपूर्वीच ५० वी बर्थडे साजरा झाला. मात्र अद्यापही तिची बॉलीवूडवरील जादू कायम आहे. 

Updated: Nov 12, 2018, 11:12 PM IST
...म्हणून सुरेश वाडकरांनी दिला होता माधुरीला लग्नासाठी नकार title=

मुंबई : बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा काही दिवसांपूर्वीच ५० वी बर्थडे साजरा झाला. मात्र अद्यापही तिची बॉलीवूडवरील जादू कायम आहे. बॉलीवूडमध्ये अनेक हिट सिनेमे देणारी माधुरी सध्या तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवतेय. माधुरीच्या लाईफबद्दल तिच्या चाहत्यांना सगळी माहिती आहेच. मात्र तुम्हाला माहीत आहे का एकेकाळी गायक सुरेश वाडकर यांनी माधुरीसोबतच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. 

एका वेबसाईटमध्ये छापलेल्या बातमीनुसार, माधुरीच्या घरातले गायक सुरेश वाडकर यांच्याकडे माधुरीचे स्थळ घेऊन गेले होते. त्या दिवसांत सुरेश वाडकर यांचे करियर सुरु झाले होते. माधुरी त्यांच्याहून १२ वर्षांनी लहान होती. त्यामुळे मुलगी बारीक असल्याचे सांगत त्यांनी या प्रस्तावास नकार दिला होता. 

मात्र त्यानंतर माधुरीचा विवाह लंडनमध्ये राहणाऱ्या डॉ. राम नेने यांच्याशी झाला. मात्र त्यापूर्वीच माधुरीने बॉलीवूडमध्ये हिट हिरोईन म्हणून स्थान मिळवले होते.