सैराटनंतर आता प्री वेडिंग शूटसाठी या गाण्याची क्रेझ

सध्या झी मराठी वाहिनीवर राणादा आणि अंजलीबाईंच्या प्रेमकहाणीवर आधारित तुझ्यात जीव रंगला या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळतोय. यातील गाणे, पात्रे या सर्वांनीच प्रेक्षकांवर भुरळ घातलीये.

Updated: May 25, 2017, 05:22 PM IST
सैराटनंतर आता प्री वेडिंग शूटसाठी या गाण्याची क्रेझ title=

मुंबई : सध्या झी मराठी वाहिनीवर राणादा आणि अंजलीबाईंच्या प्रेमकहाणीवर आधारित तुझ्यात जीव रंगला या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळतोय. यातील गाणे, पात्रे या सर्वांनीच प्रेक्षकांवर भुरळ घातलीये.

इतकंच नव्हे तर या मालिकेच्या शीर्षकगीतावर तर आता प्री वेडिंग शूटही केले जातेय. गेल्या वर्षी सैराट हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील गाण्यांनी लोकांना अक्षऱश: वेड लावले होते. अनेक प्री वेडिंग शूटसाठी सैराटमधील गाण्यांवर अनेक प्री वेडिंग शूट करण्यात आले होते. त्यानंतर आता तुझ्यात जीव रंगलाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतेय.