आईच्या स्मरणार्थ सनी कॅन्सर प्रोजेक्ट सुरु करणार

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओन तिच्या आईच्या स्मरणार्थ हिमाचल प्रदेश येथे कॅन्सर प्रोजेक्ट सुरु करणार आहे. २००८ मध्ये कॅन्सरमुळे सनीच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सनीने हा प्रोजेक्ट करायचे ठरवलेय.

Updated: Jan 22, 2016, 11:27 AM IST
आईच्या स्मरणार्थ सनी कॅन्सर प्रोजेक्ट सुरु करणार title=

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओन तिच्या आईच्या स्मरणार्थ हिमाचल प्रदेश येथे कॅन्सर प्रोजेक्ट सुरु करणार आहे. २००८ मध्ये कॅन्सरमुळे सनीच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सनीने हा प्रोजेक्ट करायचे ठरवलेय.

सध्या सनी मनालीमध्ये पॅरानॉर्मल या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करतेय. हे शूटिंग संपल्यानंतर ती प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करणार आहे. 

आईच्या स्मरणार्थ ती हा प्रोजेक्ट करतेय. सनीची आई सिरमौर येथील रहिवासी होती. मात्र लग्नानंतर ती कॅनडाला निघून गेली. २००८मध्ये सनीच्या आईचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला.