फिल्म रिव्ह्यू : 'गुरू'मधून अंकुश हॅट्रीक मारणार?

मराठीतला मोस्ट अवेटेड 'गुरु' हा सिनेमाही आपल्या भेटीला आलाय. 'गुरु' या तरुणाची ही गोष्ट... 

Updated: Jan 22, 2016, 12:29 PM IST
फिल्म रिव्ह्यू : 'गुरू'मधून अंकुश हॅट्रीक मारणार?

निर्माता : सुनील लुल्ला, दीपक पांडुरंग राणे

दिग्दर्शक : संजय जाधव

कलाकार : अंकुश चौधरी, उर्मिला कानेटकर-कोठारे

जयंती वाघधरे, मुंबई : मराठीतला मोस्ट अवेटेड 'गुरु' हा सिनेमाही आपल्या भेटीला आलाय. 'गुरु' या तरुणाची ही गोष्ट... 

आपल्या दुनियेत मस्त राहणारा हा गुरु, नेहमीप्रमाणे आपलं आयुष्य आपल्या जवळच्या मित्रांसोबत छान जगत असतो. छोटया मोठ्या चोऱ्या करुन आपला गुजारा करत असतो. पण एक दिवस गुरुच्या आय़ुष्यात एक वेगळाच ट्विस्ट येतो. आपल्या डोळ्यासमोर खून होताना तो पाहतो, जी माणसं या गुन्ह्यात सामील असतात ती आता गुरुच्याही जीवावर उठतात. या सगळ्या प्रकरणातून सुटण्यासाठी गुरु आपल्या गावी निघून जातो. पण गावी आल्यानंतर आणखी काही समस्या त्याच्या समोर य़ेउन उभ्या राहतात.. या सगळ्या अडचणीतून गुरुची सुटका होते का? त्या गुन्होगारांना शिक्षा मिळते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गुरु हा सिनेमा पाहिल्यावरच मिळेल.

कमर्शिअल सिनेमा 

गुरु हा सिनेमा एक कम्प्लिट कमर्शियल अॅक्शन मसालापट असल्यामुळे संजय जाधवनं गुरु या सिनेमाला, अगदी सिनेमाच्या विषयाप्रमाणेच ट्रीटमेंन्ट दिलीय. या सिनेमात तुम्हाला अनेक स्टंट्स दिसतील, सिनेमातला हिरो दहा विलन्सना एकत्र चोपताना दिसेल, साउथ सिनेमांचा एक टच असलेला गुरु हा सिनेमा आहे.. आणि या मुळे सिनेमाचा जॉनर लक्षात ठेउन दिग्दर्शक संजय जाधव यांनी सिनेमाची हाताळणी ब-यापैकी चांगली केली आहे.

अंकुश हॅट्रीक मारणार?

अभिनेता अंकुश चौधरीचा विशेष उल्लेख करावासा वाटतो कारण डबल सीट आणि दगडी चाळ सारखे सिनेमे दिल्यानंतर आता अंकुश हॅट्रीक मारतो का? याकडेच सर्वाचं लक्ष लागून आहे, सिनेमातल्या परफॉर्मन्समध्येतरी त्यानं छान कामगीरी केली आहे पण बॉक्स ऑफिसवर त्याची ही जादू चालणार का? हे पाहणं जास्त इंटरेस्टींग ठरेल.

उर्मिला कानेटकर 

अभिनेत्री उर्मीला कानेटकरही सिनेमात तिच्या वाटेला आलेले सीन्स चोख पार पाडले आहेत. खरंतर सिनेमातला तिचा लूक पाहून दबंद सिनेमातल्या सोनाक्षी सिन्हाचा आठवण येते, कारण या सिनेमात तिला जवळ जवळ तसाच लूक देण्यात आलाय. उर्मिला सिनेमात फार दिसली नसेल तरी तिला परफॉर्मन्स चांगला झालाय.

सिनेमाचं संगीत - लेखन

सिनेमाचं संगीत छान झालंय.. फिल्मी फिल्मी हे गाणं असो किंवा कशाला उद्याची बात असो, संगीतकार अमितराज आणि पंकज पडघम यांनी बरं संगीत सिनेमाला दिलंय. गाण्यासोबतच सिनेमातले संवाद हे सिनेमागृह सोडल्यानंतरही प्रेक्षकांच्या लक्षात राहतील असे आहेत.. दुनिया गोल है, जिंदगी झोल है, आणि विषय खोल आहे असे अनेक डायलॉग्स आहे जे सिनेमानंतरही लोकांच्या लक्षात राहतील.. उर्मिला आणि अंकुशची केमिस्ट्री छान रंगली आहे.

शेवटी काय तर... 

सिनेमाची सुरुवात छान झाली आहे पण पूर्वाधपेक्षा उत्तार्थ जास्त रंगलाय.. सिनेमाच्या सुरुवातीला जर आणखी कात्री फिरवता आली असती तर कदाचित सिनेमा आणखी क्रिस्प झाला असता.. सिनेमाची मांडणी छान झालीये आणि एक कंप्लिट कमर्शियल मसाला सिनेमा असल्यामुळे अनेक असे स्टंट्स आहेत किेवा काही सीन्स आहेत जे तुम्हाला थोडेसे इललोजिकल वाटतील पण त्याला पर्याय नाही कारण हा एक मसालापट आहे.. सो केवळ एक फॅमिली एंटरटेनर म्हणुन किंवा टाइमपास सिनेमा म्हणुन एकदातरी गुरु पाहायला हरकत नाही. 

कलाकारांचे परफॉर्मन्स, सिनेमाला देण्यात आलेली ट्रीटमेन्ट, संगीत, संवाद..हे सगळे फॅक्टर्स पाहता आम्ही 'गुरु' या सिनेमाला देतेय ३ स्टार्स... 

  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x