सनी लिऑन आता देणार फेमस होण्याच्या टीप्स!

पॉर्नस्टार ते अभिनेत्री अशी कारकीर्द असणारी अभिनेत्री सनी लिऑन आता मार्गदर्शन करणार आहे. यावर विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे. लवकरच सुरू होणाऱ्या एका ऑनलाइन रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल. 

Updated: Feb 1, 2015, 02:05 PM IST
सनी लिऑन आता देणार फेमस होण्याच्या टीप्स!   title=

मुंबई: पॉर्नस्टार ते अभिनेत्री अशी कारकीर्द असणारी अभिनेत्री सनी लिऑन आता मार्गदर्शन करणार आहे. यावर विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे. लवकरच सुरू होणाऱ्या एका ऑनलाइन रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल. 

या शोमध्ये ती नव्या पिढीतील तरुणाईला इंटरनेटवर फेमस होण्याचे फंडे, चित्रीकरण कसं करावं अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचे धडे देणार आहे. या शोमध्ये कलाकार, गायक, डान्सर्स सहभाग घेणार आहेत.

गेल्या वर्षी म्हणजे २०१४ मध्ये इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च केली गेलेली हॉट अभिनेत्री म्हणजे सनी लिऑन होती. “ज्यावेळी या ऑनलाईन शोच्या मेकर्सनी शोची संकल्पना सांगितली, तेव्हा ती मला खूप आवडली. म्हणून या शोमध्ये सहभाग घेण्याचा निर्णय घेतला”,असं सनी लिऑननं सांगितलं.
 
या ऑनलाईन रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाला एक व्हिडिओ शूट करुन इंटरनेटवर अपलोड करावा लागणार आहे. ज्याचा व्हिडिओ सर्वात जास्त हिट्स मिळवेल तो स्पर्धेचा विजेता असणार आहे, अशी एकंदरीत स्पर्धेची थीम आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.