'हैदर' आणि 'क्वीन' फिल्मफेअरचे राजा-राणी !

प्रतिष्ठित मानले जाणारे फिल्मफेअर अवॉर्ड्स नुकतेच जाहीर झाले.  'मै रहूँ के मैं नही' म्हणत हैदर साकरणा-या शाहिद कपूरनं सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तर राणी  मेहराची भूमिका साकारणारी कंगणा राणावत बॉलिवडूची क्वीन ठरली.. 

Updated: Feb 1, 2015, 10:28 AM IST
'हैदर' आणि 'क्वीन' फिल्मफेअरचे राजा-राणी ! title=

मुंबई: प्रतिष्ठित मानले जाणारे फिल्मफेअर अवॉर्ड्स नुकतेच जाहीर झाले आहेत.  'मै रहूँ के मैं नही' म्हणत हैदर साकरणाऱ्या शाहिद कपूरनं सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तर राणी मेहराची भूमिका साकारणारी कंगणा राणावत बॉलिवडूची क्वीन ठरली.

पीके, 2 स्टेट्स, हैदर, मेरी कॉम या चित्रपटांना मागे टाकत कंगणाच्या 'क्वीन'नं फिल्मफेअरवर आपली सत्ता असल्याचं दाखवून दिलं. अवघ्या साडेबारा कोटींचं बजेट असलेल्या क्वीननं तब्बल 97 कोटींची कमाई केली होती, इतकंच नाही तर प्रेक्षकांपासून ते फिल्म क्रिटिक्सच्या मनावरही क्वीननं चांगलीच छाप सोडली होती. फिल्मफेअरमध्ये क्वीननं सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर, सर्वोत्कृष्ट सिनेमोटोग्राफी आणि सर्वोत्कृष्ट एडिटिंग असे 6 अवॉर्ड्स पटकावले. 

हैदरमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडलेल्या के. के. मेनन आणि तब्बू दोघांनाही सर्वोत्कृष्ट सहकलाकारचं पारितोषिक मिळालं. शंकर एहसान लॉय या त्रिकुटाला 2 स्टेट्ससाठी सर्वोत्कृष्ट संगीत, तर 'मुस्कुराने की वजह' या गाण्यासाठी रश्मी सिंगला सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला. 'गलियाँ'साठी अंकित तिवारी आणि 'बेबी डॉल'साठी कनिका कपूर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकासाठी गौरवण्यात आलं.
जेष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 

 

असा होता फिल्मफेअर सोहळा 

 

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट-  अनुराग कश्यप, विक्रमादित्य    मोटवानी-    क्वीन
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-  विकास भल-    क्वीन
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता-  शाहिद कपूर-     हैदर
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-  कंगणा राणावत- क्वीन
  • सर्वोत्कृष्ट सहअभिनेता-  के के मेनन-    हैदर
  • सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री-   तब्बू-   हैदर
  • सर्वोत्कृष्ट डेब्यू (अभिनेता)-  फबाद अफझल खान-    खुबसुरत
  • सर्वोत्कृष्ट डेब्यू (अभिनेत्री)-  कृती सोनन-    हिरोपंती
  • सर्वोत्कृष्ट डेब्यू (दिग्दर्शक)-  अभिषेक वर्मन-        2 स्टेट्स    
  • सर्वोत्कृष्ट संगीत-   शंकर एहसान लॉय-    2 स्टेट्स
  • सर्वोत्कृष्ट गीतकार-   रश्मी सिंग-   मुस्कुराने कीवजह-  सिटी लाईट्स
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक-   अंकित तिवारी-   गलियाँ-    एक विलन
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका-   कनिका कपूर-   बेबी डॉल-   रागिनी एमएमएस 2

 

क्रिटिक्स अवॉर्ड

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट-    आखों देखीं
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-   रजत कपूर-  आखों देखीं
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता-   संजय मिश्रा-  आखों देखीं
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-    आलिया भट-  हायवे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.