सुल्तानची नऊ दिवसांत 229.16 कोटींची कमाई

सलमान खान आणि अनुष्का शर्मा स्टारर सुल्तान बॉक्स ऑफिसवर वेगाने धावतोय. 

Updated: Jul 16, 2016, 10:27 AM IST
सुल्तानची नऊ दिवसांत 229.16 कोटींची कमाई title=

मुंबई : सलमान खान आणि अनुष्का शर्मा स्टारर सुल्तान बॉक्स ऑफिसवर वेगाने धावतोय. 

या सिनेमाने अवघ्या ९ दिवसांत २२९.१६ कोटींची कमाई केलीये. सुल्तानमधील सलमानचे आणि अनुष्काचे काम सगळ्यांना भावतेय. दोघांनीही या चित्रपटासाठी मोठी मेहनत घेतल्याचे दिसून येतेय. 

ज्याप्रमाणे सुल्तान बॉक्स ऑफिसवर वेगाने घोडदौड करतोय त्याप्रमाणेच बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड लवकरच तोडेल अशी शक्यता आहे.