सोनू निगमने शेअर केला आदेश श्रीवास्तवचा अखेरचा व्हॉट्सअॅप मॅसेज

प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री निधन झालं. त्यांच्या मृत्युनंतर बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध मंडळींनी दु:ख व्यक्त करत आपल्या आठवणी शेअर केल्या. आदेश श्रीवास्तव यांचा सर्वात जवळच्या मित्रांमध्ये गायक सोनू निगम आहे. सोनूनं नुकताच आदेश श्रीवास्तव यांचा अखेरचा व्हॉट्स अॅप मॅसेज शेअर केला.

Updated: Sep 9, 2015, 09:38 AM IST
सोनू निगमने शेअर केला आदेश श्रीवास्तवचा अखेरचा व्हॉट्सअॅप मॅसेज  title=

मुंबई: प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री निधन झालं. त्यांच्या मृत्युनंतर बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध मंडळींनी दु:ख व्यक्त करत आपल्या आठवणी शेअर केल्या. आदेश श्रीवास्तव यांचा सर्वात जवळच्या मित्रांमध्ये गायक सोनू निगम आहे. सोनूनं नुकताच आदेश श्रीवास्तव यांचा अखेरचा व्हॉट्स अॅप मॅसेज शेअर केला.

आणखी वाचा - संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं निधन

सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्या मित्राची आठवण काढत सोनू निगमने आदेश यांच्या अखेरच्या व्हॉट्सअॅप मॅसेजचा फोटो शेअर केला. आदेश यांनी सेल्फी काढून सोनूला पाठवली होती. जेव्हा त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

 

२५ जुलैला झालेल्या या संभाषणात आदेश श्रीवास्तव यांनी सोनूला म्हटलं, "मेरे छोटे भाई...खुश रहो. " याचं उत्तर देत सोनूनं आदेशला लवकर बरा होशिल असं म्हटलं.

बॉलिवूडमध्ये अनेक गाण्यांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. सोनू आदेशचा खूप जवळचा मित्र होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.