मुंबई : अभिनेता शशांक केतकर याचा प्रियांका ढवळेबरोबर साखरपुडा झाला. पण या साखरपुड्यावरून सुरु झालेल्या वादावर शशांक चांगलाच भडकला आहे. लोकसत्ता या वृत्तपत्रानं छापलेल्या शशांकच्या बातमीचा फोटो मॉर्फ करण्यात आला आणि त्यावर आक्षेपार्ह मजकुर लिहिण्यात आला होता. मॉर्फ केलेल्या या फोटोवरून लोकसत्तानं तक्रारही दाखल केली आहे. याच मुद्द्यावरून शशांकनं फेसबूकवर पोस्ट शेअर केली आहे.
काल साखरपुडा छोट्या स्वरुपात पण अगदी थाटामाटात साजरा झाला. अनेकांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद आमच्या पर्यंत पोहोचल्या. काही negative कमेंट्स देखील वाचायला मिळाल्या. सगळ्या कमेंट्स आम्ही sportingly घेतल्या. पण एका पोस्टनी खूप अस्वस्थ झालो.
लोकसत्ताचे नाव वापरून क्षणीक आनंदासाठी केलेला प्रकार अतिशय खेदजनक आणि त्रासदायक आहे. जा विघ्नसंतोषी व्यक्तीनं बातमी photoshop वापरून बदलली त्याचा police समाचार घेतीलच, पण मला सगळ्याच negative कमेंट्स करून बौद्धीक पातळीचा बाजार मांडणार्या मंडळींना विचारायच की आम्ही कलाकार म्हणजे कोण वाटलोहो तुम्हा सर्वांना? खाजगी आयुष्य नसलेले भावना शून्य दगड ? खरंतर ह्या असल्या बातम्यांचा अन गाॅसिप चा शश्प फरक पडत नाही पण एकदा, कलाकार म्हणून काम करणार्या माणसाचा विचार करा ना !
Specifically माझ्या विषयी बोलतो. माझा Past, Present आणि Future सगळंच खूप वैयक्तिक आहे. माझी एक family आहे ज्यात genuinely प्रेम करणारे, काळजी करणारे, माझा आनंद, सुख कशात आहे हे ओळखणारे आई वडील, बहिण, मित्र- मैत्रीणी आहेत. मला माझ्या Past बद्दल भयंकर आदर आहे पण म्हणून तुम्हाला हवं तसं मी माझं आयुष्य डिज़ाइन करू शकत नाही. याचा अर्थ असाही नाही की मी चाहत्यांचा सन्मान करत नाही. I truly respect my fans, अपेक्षा इतकीच आहे की माझा अन माझ्या माणसांचा, माझ्या space चा तुम्ही सुद्धा respect करावा. इतकं सांगूनही काही लोक त्यांना हवा तोच अर्थ काढतील पण त्याला मी काहीच करू शकत नाही. बाकी, सुज्ञास आणखी सांगणे न लागे.
Once again a big thank you to the team Loksatta for taking an Immediate action with respect to the same. I really hope people will really understand the difference between a 'Public Figure' and a 'Public Property'.
Big Big thank you to all my Industry Friends for their immediate support. It really means a lot. And once again a big thank you to all my Fans who are my strength. This was a Long, but also a necessary Post.